कोल्हापूर : बाळूमामांचे दर्शन घेऊन घरी जाताना चालत्या दुचाकीवर झाड कोसळले

Kolhapur News | निढोरी - कागल रस्त्यावरील घटना
tree falls on bike
निढोरी - कागल रस्त्यावर चालत्या दुचाकीवर झाड कोसळले.Pudhari Photo
Published on
Updated on

मुदाळतिट्टा: पुढारी वृत्तसेवा: श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामांचे दर्शन घेऊन घरी जात असलेल्या दोन युवकांच्या चालत्या दुचाकीवर निलगिरीचे झाड अचानक कोसळले. या घटनेत मोटरसायकल वरील दोन तरुण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 27) दुपारी 1. 15 वाजता निढोरी - कागल रस्त्यावरील मळगे खुर्द - मळगे बुद्रुक दरम्यान घडली. (Kolhapur News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अमावस्या यात्रेसाठी करंजवडे (जि. सांगली) येथील निखिल कांबळे व राजरतन काळे (एमएच दहा सी जे 70 76) मोटरसायकलवरून आदमापूर येथे आले होते. देवदर्शन घेऊन गावी परत जात असताना मोठे निलगिरीचे झाड अचानक त्यांच्या चालत्या गाडीवर कोसळले. यावेळी नागरिकांनी झाडाखाली सापडलेल्या दोघांना बाहेर काढले. राजरतन काळे यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे. तर निखिल कांबळे यांच्या छातीवर जखम झाली आहे. त्यांच्यावर मुरगूड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

tree falls on bike
कोल्हापूर : 57 कोटींवर डल्ला मारणार्‍यास मदत करणारा कोण?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news