kolhapur News‌ : ‘कोषागार‌’मधून वर्षभरात नऊ हजार कोटींचे वाटप

रात्री उशिरापर्यंत कामकाज; केवळ मार्च महिन्यात एक हजार कोटींची देयके अदा
treasury department
‘कोषागार‌’मधून वर्षभरात नऊ हजार कोटींचे वाटप
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचा खर्च विविध योजना, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची विविध देयकांचे जिल्हा कोषागार कार्यालयातून वर्षभरात सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. वर्षअखेरीच्या धामधुमीमुळे फक्त मार्च महिन्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. वर्षअखेर असल्याने मंगळवारी या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात दाखल झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अक्षरश: रात्र जागविली.

वर्षअखेरीस कोषागार कार्यालयात मोठी धांदल सुरू असते. मार्च एंडिंगमुळे तर 31 मार्च रोजी रात्रभर बिले मंजुरीची प्रक्रिया सुरू असते. या वर्षीचा निधी याच वर्षात खर्ची टाकण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षात कोषागार कार्यालयातून विविध कार्यालयांतील सुमारे 44 ते 45 हजार बिले मंजूर करून त्या बिलापोटी सुमारे नऊ हजार 290 कोटी 74 लाख 97 हजार 979 रुपये वाटप करण्यात आले आहेत. 1 ते 31 मार्च या एक महिन्यात 9 हजार बिले मंजूर करून त्यासाठी एक हजार 500 कोटी 90 लाख 3 हजार 125 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

मंगळवारी टार्गेट पूर्ण करण्याची धांदल असल्याने या सर्व विभागात रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू राहिले. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत या कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news