

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दी आणी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी यंदा भाविकांना बिनखांबी गणेश मंदिराकडून प्रवेश दिला जाणार असून, पापाची तिकटीकडून बिनखांबी मंदिराकडे उलट्या दिशेने येण्यास मनाई केली आहे. ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी रोड, भेंडे गल्ली या मार्गांवरूनही मुख्य मिरवणुकीत येण्यास बंदी केली असून पिशवीकर हॉस्पिटल, कसबा गेट चौकी, पुष्कराज तरुण मंडळ, गुजरी कॉर्नर मार्गावरून प्रवेश बंद राहणार आहे.
नवीन विसर्जन मार्ग
व्हीनस चौक, विल्सन पूल, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीज, आझाद चौक, दुर्गा हॉटेल, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, पापाची तिकटी, गंगावेश
व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकीजमार्गे मुख्य मार्ग किंवा पारंपरिक मार्ग
फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा, पद्मा चौक, बिंदू चौक, शिवाजी रोड, पापाची तिकटी
नंगीवली चौक, कोळेकर तिकटी,
मिरजकर तिकटीमार्गे मुख्य मार्ग
खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश
मंदिरमार्गे मुख्य मिरवणूक मार्ग
ताराबाई रोड, रंकाळा, साकोली कॉर्नर, तटाकडील तालीम, महाद्वार चौकमार्गे पुढे
विसर्जनानंतर परतीचा मार्ग
शिवाजी पेठ, मंगळवार पेठ येथील मंडळांचे वाहनांकरिता रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, साई मंदिर कळंबा, तपोवन मैदान
राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी येथील मंडळांच्या वाहनांकरीता रावजी मंगल कार्यालय, नवीन वाशी नाका, चिवा बाजार, कळंबा कारागृह, रामानंदनगर, जरगनगर, शेंडा पार्क, सायबर चौक
पार्किंग सुविधा...
शहाजी कॉलेज, दसरा चौक, शाहू दयानंद हायस्कूल, लक्ष्मी जिमखाना, चित्रदुर्ग मठ, शिवाजी स्टेडियम, शाहू स्टेडियमसमोर, दुधाळी, बिंदू चौक, तोरस्कर चौक शाळा, गांधी मैदान, ताराराणी हायस्कूल मंगळवार पेठ, संभाजीनगर बसस्थानक, सिद्धार्थनगर कमान, पेटाळा मैदान, निर्माण चौक
वाहतुकीस बंद मार्ग....
पन्हाळ्याकडे जाणारी व येणारी वाहने सीपीआर चौक, तोरस्कर चौक, शिवाजी पूलमार्गे जातील.
शहरातून गारगोटी, राधानगरी, गगनबावड्याकडील वाहतूक ताराराणी पुतळा, रेल्वे उड्डाणपूल, हायवे कॅन्टीन, सायबर चौक, रिंग रोड मार्गे हॉकी स्टेडियम येथून रामानंदनगर, कळंबा कारागृह, नवीन वाशी नाका, फुलेवाडी रिंगरोड
शिये फाटा, कसबा बावडामार्गे शहरात येणारी सर्व प्रकारची जड, अवजड वाहने शहरात न येता राष्ट्रीय महामार्गावरून पुढे जाऊन तावडे हॉटेल, शिरोली टोल नाका मार्गे शहरात येतील.
सहा ठिकाणी वैद्यकीय मदत...
घाटी दरवाजा
पापाची तिकटी
गंगावेश चौक
सावित्रीबाई फुले
इराणी खण
बिंदू चौक