kolhapur | पाचवी, आठवी शिष्यवृत्तीत पुन्हा कोल्हापूरचा डंका
कोल्हापूर : राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी राज्यात गुणवत्तेचा झेंडा रोवला. शहरी व ग्रामीण विभागात मिळून कोल्हापूर जिल्ह्यातील पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 80 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. पाचवी शिष्यवृत्तीत ग्रामीण विभागात विद्यामंदिर सोनाळीच्या (ता. भुदरगड) ईश्वरी दिग्विजय कोटकरने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. आठवी शिष्यवृत्तीमध्ये ग्रामीण विभागात नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय, पालकरवाडी (ता. राधानगरी) येथील नुपूर युवराज पोवारने 96 टक्के गुण संपादन करून राज्यात पहिला क्रमांक मिळवला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 9 फेब्रुवारी रोजी पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. 40 हजार 954 विद्यार्थी दोन्ही परीक्षांना उपस्थित होते. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 10) राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला.
पाचवी शिष्यवृत्ती निकाल (ग्रामीण व शहर)
जिल्ह्यात पाचवीत पहिल्या दहामध्ये भुदरगडचे 3, तर आठवीत 6 विद्यार्थी आहेत. पाचवी शिष्यवृत्तीत (ग्रामीण) ईश्वरी कोटकर हिने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. सेंट्रल स्कूल, फेजिवडेची सौरभी सूर्यकांत डवरने (97.33 टक्के) राज्यात दुसरा, श्री विठ्ठल विद्यामंदिर, पेद्रेवाडीचा श्लोक शशिकांत पाटील याने 96.66 टक्के, विद्यामंदिर सोनाळीच्या स्वरा आदेश सापळे हिने 96.66 टक्के गुण संपादन करीत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. मराठी विद्यामंदिर, मडिवळेचा शिरीष मनोहर मसूरकर, सेंट्रल स्कूल, पिंपळगावचा आदित्य दिगंबर मिसाळने अनुक्रमे राज्यात 6 वा क्रमांक मिळवला. विद्यामंदिर म्हाकवेचा हर्षल सुनील पाटील, विद्यामंदिर ताडशिनाळमधील तनय दिगंबर कुंभार, मराठी विद्यामंदिर, कोळीकची स्वरदिशा गणपती लोहारने राज्यात आठवा क्रमांक पटकावला.
सेंट्रल स्कूल राजगोळीचा विराज सुनील पाटील, सेंट्रल स्कूल फेजिवडेचा प्रतापसूर्य विक्रम पाटील, सेंट्रल स्कूल, तारळे खुर्दमधील दिशांत दीपक रणदिवे, विद्यामंदिर सोनाळी येथील चैतन्य चंद्रकांत चव्हाण, बाबासाहेब पाटील हायस्कूल कोतोलीचा रुद्राक्ष राजाराम पाटील, कन्या विद्यामंदिर, वाठार, वडगावमधील ऋतुजा गणपती हट्टी, विद्यामंदिर खानापूरचा संकल्प विठ्ठल कोळी यांनी अनुक्रमे राज्यात 9 वा क्रमांक, तर सेंट्रल स्कूल फेजिवडेच्या अथर्व आनंदा शिंदे, विद्यामंदिर दारवाडची श्रेया तानाजी गुरव, विद्यामंदिर पाडळी बुद्रुकचा सर्वेश गुरुनाथ मोरे, विद्यामंदिर बसरेवाडीची स्नेहल युवराज राजगिरे यांनी राज्यात 10 वा क्रमांक मिळवला. पाचवी शिष्यवृत्तीत शहरातील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचा अद्वैत दिलीप पोवार, स्वरा अरुण पाटील यांनी अनुक्रमे राज्यात 5 क्रमांक, तर संस्कार शहाजी पाटील, मधुरिमा भरतकुमार जाधवने राज्यात 6 क्रमांक मिळवला. तेजस मुक्त विद्यालयातील अर्णव विकास शिंदे याने राज्यात आठवा क्रमांक मिळविला. फुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयचा रौनक उत्तम वाईंगडे याने राज्यात 9 वा क्रमांक पटकावला.
आठवी शिष्यवृत्ती निकाल (ग्रामीण, शहर)
आठवी ग्रामीण शिष्यवृत्तीमध्ये नुपूर पोवारने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. कुमार भवन, पुष्पनगरच्या पार्थ चंद्रकांत पाटील याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, तिरवडेचा यश लक्ष्मण पाटील, कुमार भवन, पुष्पनगरचा पार्थ बजरंग व्हरकड, दत्ताजीराव कदम हायस्कूलचा आविष्कार मुकुंद माळी यांनी राज्यात 7 वा क्रमांक मिळवला. मोहनलाल दोशी विद्यालय, अर्जुननगरची शर्वरी अभिजित पाटील, श्री. पी. बी. पाटील हायस्कूलमधील कुमोदिनी कुमार कुरुकले यांनी राज्यात 9 वा क्रमांक पटकावला. आठवी शिष्यवृत्तीत (शहर) व्यकंटराव हायस्कूल आजरा येथील सुश्रुती अमित पुंडपाळने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूलची श्वेतल सुनील बंडगर, व्यंकटराव हायस्कूल, आजराचा विवेक धनाजी पाटील, स्वराज प्रवीण निंबाळकर यांनी राज्यात 8 वा क्रमांक संपादन केला. गंगामाई गर्ल्स हायस्कूलची संस्कृती संतोष अबाले, तात्यासाहेब मुसळे विद्यामंदिरचा सिद्धार्थ सूरज पिसे यांनी राज्यात 10 वा क्रमांक मिळवला.

