Kolhapur Police Commissionerate | कोल्हापूरला लवकरच पोलिस आयुक्तालय

प्रस्‍ताव प्राप्‍त : राज्य शासन सकारात्मक: गृहराज्यमंत्री योगेश कदम
Kolhapur Police Commissionerate |
Kolhapur Police Commissionerate | कोल्हापूरला लवकरच पोलिस आयुक्तालय
Published on
Updated on

अनिल देशमुख

कोल्हापूर : कोल्हापूरला लवकरच पोलिस आयुक्तालय होणार आहे. तसे संकेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. प्रस्ताव प्राप्त झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झालेली आहे. याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेले मंत्री कदम यांना पोलिस आयुक्तालयाबाबत विचारता ते म्हणाले, सर्किट बेंच, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील वाढती गर्दी या सर्व पार्श्वभूमीवर सध्या त्यासाठीचे पोषक वातावरण तयार झाले आहे. याच अनुषंगाने आयुक्तालयाचा प्रस्ताव राज्य शासनाला प्राप्त झाला आहे. या प्रस्तावावर मुख्‍यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यावर भर

सध्या सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकारात फसवणुकीमुळे नागरिकांची गेलेली रक्कम परत मिळवून देण्यावर अधिक भर दिला जात आहे, त्यादृष्टीने तातडीने तपास आणि कार्यवाही करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news