कोल्हापूर : कासारवाडी येथील वन हद्दीत उत्खनन करताना तीन पोकलेन मशीन जप्त

खाण मालक, पोकलेन ड्रायव्हर व मालकांवर कारवाई
कोल्हापूर : कासारवाडी येथील वन हद्दीत उत्खनन करताना तीन पोकलेन मशीन जप्त
File Photo
Published on
Updated on

कासारवाडी : कासारवाडी येथील वन हद्दीत खोदकाम करताना तीन पोकलेन मशीन जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी वन विभागाकडून खाण मालक, पोकलेन ड्रायव्हर व मालकांवर कारवाई करण्यात आली.

कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील डोंगर परिसरात वन विभागाची हद्द आहे. या परिसराच्या आजूबाजूला खण व्यवसाय व क्रेशर व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. बुधवारी नरंदेचे वनपाल एम. एस. पोवार हे या भागात फिरत असताना वन विभागातील संरक्षित वनहद्दीमध्ये खोदकाम केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी टोप येथील खान मालक यांच्यावर गुन्हा नोंद करत पोकलॅन मशीनचे ड्रायव्हर नागराज नाटेकर, शिवानंद माचेवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

तसेच खोदकाम करण्यासाठी वापरण्यात आलेले तीन पोकलॅन मशीन व खोदकाम करून काढण्यात आलेला माल वन विभागाने ताब्यात घेतला. सदरची कारवाई कोल्हापूर उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नरेंदेचे वनपाल एम. एस.पोवार, वनसेवक श्रद्धा सोनटक्के यांनी केली.

कारवाई बद्दल नागरिकांच्यात तर्क वितर्क

येथील डोंगर परिसर चार वर्षांपूर्वी वन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यावेळी सदर डोंगराची मोजणी करून हद्दी निश्चित करून वनविभागाने डोंगर ताब्यात घेतला होता. यानंतर अनेक वेळा वनहद्दीला लागून अवैद्य खोदकाम केले. आत्ताच मात्र कारवाई कशी झाली याची चर्चा नागरिकांच्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news