Gold Jewellery Robbery | डिलिव्‍हरी बॉयच निघाला चोरटा...

शिवाजी पेठेतील ११ तोळे चोरीचा ४८ तासांत छडा; एकास अटक, दागिने हस्तगत
Gold Jewellery Robbery |
Gold Jewellery Robbery | डिलिव्‍हरी बॉयच निघाला चोरटा...
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शिवाजी पेठ येथून भरदिवसा घरातून ११ तोळे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी (दि. १८) घडली होती. याचा छडा जुना राजवाडा पोलिसांनी ४८ तासांत करून सराईत चोरट्यास अटक केली. सोहेल समीर शेख (वय २८, मुळ रा. पुणे, सध्या रा. लक्षतीर्थ वसाहत) याला अटक करून त्याच्या ताब्यातून ११ तोळे दागिने हस्तगत केले.

शिवाजी पेठ येथील शुभदा सुरेश मंडलिक (वय ६३) यांच्या घरी रविवारी भरदिवसा सहा तोळ्याच्या दोन सोन्याच्या पाटल्या, पाच तोळ्याचे मंगळसूत्र अशा ११ तोळे दागिन्यांची चोरी झाली होती. चोरट्याने तिजोरीला असलेल्या किल्ल्यांचा वापर करून इतर साहित्य न विस्कटता ही चोरी केली होती. जुना राजवाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला असता, रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सोहेल शेख हा घरात शिरल्याचे दिसून आले. तो चोरीचे दागिने विक्रीसाठी अंबाई टँक परिसरात घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानुसार मंगळवारी सायंकाळी सोहेलला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून दागिने हस्तगत केले. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आतिष म्हेत्रे, पोलिस अंमलदार विजय तळसकर, प्रशांत घोलप, योगेश शिंदे, श्रीधर जाधव यांनी ही कारवाई केली. दरम्यान, सोहेल शेख एका खाद्यपदार्थ ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीमध्ये कामास होता. यापूर्वी काहीवेळा तो मंडलिक यांच्या घरी फुड ऑर्डर डिलिव्हरीसाठी गेला होता. यामुळे त्याला मंडलिक यांच्या घरातील माहिती होती.

किल्ली सोबत घेण्याचे विसरले अन्...

शुभदा मंडलिक या नेहमी तिजोरीच्या चाव्या आपल्या सोबतच ठेवतात. रविवारी त्या चाव्या आपल्याकडे ठेवण्याचे विसरल्या. या चाव्या तिजोरीला तशाच राहिल्याची संधी सोहेलने साधली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news