

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुद्वादशी सोहळा आज मोठ्या उत्साहात झाला. यानिमित्त काकड आरती, पंचामृत अभिषेक, किर्तन ,पवमान पठणासह विविध कार्यक्रम संपन्न झाले.
गुरुद्वादशी दिवशी श्रीनृसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी आपल्या पादुकांची येथे स्थापना केली. त्यामुळे या दिवसाला येथे विशेष महत्त्व आहे. या स्वयंभू पादुकेवर आज मोठ्या भक्ती भावाने महापूजा संपन्न झाली. यावेळी महानैवेद्यही दाखवण्यात आला. करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती ही यावेळी उपस्थित होते.
हा उत्सव सोहळा देवस्थानच्या सहकार्याने मोकाशी मंडळींच्याकडून नेटक्या पद्धतीने करण्यात आला. सौरभ राजेश खोंबारे यांनी महाप्रसाद आयोजित केला होता. याचा लाभ शेकडो भाविक व नागरिकांनी घेतला.