

जयसिंगपूर : तेरवाड (ता. शिरोळ) येथील पाटील मळ्यात 2 वर्षाची मंचरी ज्ञानेश्वर खोत ही बालिका उकळत्या दुधात पडल्याची घटना 24 फेबुवारी रोजी घडली होती. तिच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने तेरवाड व लाटवाडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
तेरवाडला 23 फेब्रुवारीपासून ग््राामदैवत श्री मंगरायासिद्ध देवाची यात्रा सुरू झाली. पाटील मळ्यात लाटवाडी-अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील महिला माहेरी यात्रेसाठी तिच्या मुलीसोबत आल्या होत्या. घरातील सर्वजण नैवेद्य करण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी आई मुलीला दूधभात चारत असताना त्या पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. आईपाठोपाठ चिमुकलीही तिच्या मागे गेली आणि तेथे उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आई व नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.