

शिरढोण : टाकवडे (ता शिरोळ) येथे शिरढोण रत्यावरील हनुमान बेकर्स जवळ राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या वस्तीवरील झोपडीतून अज्ञात चोरट्याने गुरुवारी रात्रीच्या सुमारास सहा मोबाईल व रोख रक्कम सहा हजार लंपास केली.ऊसतोड मजुरांच्या झोपडीतून चोरट्याने चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत उशिरापर्यंत शिरोळ पोलिसात नोंद झाली नाही.
टाकवडे (ता शिरोळ) येथे पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर विलास सुंदरराव कांदिलकर रा.मानकुरवाडी जिल्हा बीड हे ऊस तोडीसाठी टाकळी येथे ऊस तोडत आहेत. त्यांच्या वस्तीवर गुरुवारी रात्री एकच्या सुमारास चोरट्याने सहा मोबाईल व सहा हजार रोख रकमेची चोरी केली. सकाळी चार वाजता सदरचा प्रकार उघडकीला आला. पंचगंगा कारखान्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. होते.याबाबत नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन कारखाना अधिकारी यांनी दिल्याचे समजते. मोबाईल व रोख रक्कम असा मिळून दीड लाखाहून अधिक रकमेची चोरी झाल्याचे समजते. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.