Swine Flu : कोल्हापुरात आढळले स्वाईन फ्लूचे दहा रुग्ण

प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता व काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन
Swine Flu
Swine FluFile Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात स्वाईन फ्लूचे १० सक्रिय रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता व काळजी घेऊन स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.

स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य श्वसनविकार असून, संक्रमित व्यक्तीच्या खोकताना, शिंकताना किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या श्वसनातील थेंबाद्वारे त्याचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता, योग्य मास्क वापर आणि आजारी व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवणे याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

नागरिकांनी घ्यावयाची दक्षता...

ताप, खोकला, घसा दुखणे, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नये. लक्षणे जाणवत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. इतर व्यक्तींच्या संपर्कात येताना मास्कचा वापर करावा. खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंड रुमालाने किंवा टिश्यूने झाकावे. वापरलेला टिश्यू योग्य पद्धतीने टाकावा. साबणाने वारंवार हात धुवावेत, हँड सॅनिटायझरचा वापर करावा. डोळे, नाक व तोंडाला अस्वच्छ हातांनी स्पर्श करणे टाळावे. आजारी व्यक्तीच्या जवळचा अनावश्यक संपर्क टाळावा. ताप, खोकला किंवा इतर श्वसनविषयक लक्षणे असल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घ्यावा. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मधुमेह, हृदयरोग, श्वसनविकार किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. महापालिकेची ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व २८ उपकेंद्रे तपासणीसाठी कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news