kolhapur | कोल्हापुरात लागतात कॅन्सर रुग्णांना महिना दोन कोटी, मधुमेहींना सव्वाशे कोटींची औषधे

बजेटमधून दिलासा : औषधे स्वस्त झाल्याने मोठी बचत : रुग्णांसह नातेवाईकांत समाधान
Kolhapur cancer diabetes medicine cost
kolhapur | कोल्हापुरात लागतात कॅन्सर रुग्णांना महिना दोन कोटी, मधुमेहींना सव्वाशे कोटींची औषधे
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात महिन्याला मधुमेहींना सव्वाशे कोटी, तर कॅन्सरग्रस्तांसाठी दोन कोटींची औषधे लागतात. केंद्रीय बजेटमध्ये ही औषधे स्वस्त झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांचे लाखो रुपये वाचणार आहेत.

कॅन्सर व मधुमेहावरील जीवनावश्यक औषधांवरील कर रचना सुलभ करून त्यांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीय असून त्यांना दरमहा सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची औषधे लागतात. अनेक कुटुंबांना हा खर्च परवडत नसल्याने उपचार अर्धवट सोडण्याचे प्रकारही घडतात. दुसरीकडे मधुमेहाचे रुग्ण जवळपास प्रत्येक घरात आढळत असून इन्सुलिन, गोळ्या व नियमित तपासण्यांवर होणारा खर्च कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. औषधांच्या दरात घट झाल्यास या रुग्णांना थेट आर्थिक लाभ होणार असून उपचार नियमित घेणे शक्य होणार आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, औषधांच्या किमती कमी झाल्यास प्रतिबंधात्मक उपचारांवर भर वाढेल. रुग्ण वेळेत दवाखान्यात येतील, तपासण्या करतील आणि गुंतागुंतीचे आजार नियंत्रणात राहतील. यामुळे सरकारी रुग्णालयांवरील ताणही कमी होईल. कोल्हापुरातील अनेक स्वयंसेवी संस्था व रुग्णहक्क चळवळींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, केवळ घोषणा न राहता दर कपातीची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अर्थसंकल्पीय निर्णय कोल्हापूरसह राज्यातील लाखो रुग्णांसाठी आशादायी ठरणार आहेत. सामान्य माणसाच्या जगण्याशी थेट जोडलेल्या या तरतुदींमुळे ‘आरोग्य हक्क’ अधिक मजबूत होईल, अशी भावना कोल्हापूरकरांमध्ये व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news