

कोल्हापूर : सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोल्हापुरात बर्फ पडल्यास शहरातील प्रचलित ठिकाणे कशी दिसतील, हे दाखवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हा व्हिडीओ एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आला असून, इतका रिअल वाटतो की, पहिल्यांदा पाहताना खरेच कोल्हापुरात बर्फ पडल्याचा भास होतो. या व्हिडीओमध्ये ‘काश्मीर... छे छे, हे कोल्हापूर’ असे शब्द लिहिलेले असून, कोल्हापूरच्या सौंदर्याला एक वेगळाच पैलू दिला आहे. शहरातील प्रवेशद्वार, जोतिबा मंदिर, रंकाळा तलाव, शिवाजी विद्यापीठ रोड, दसरा चौक, भवानी मंडप परिसर, अंबाबाई मंदिर, शिवाजी पूल आणि संध्यामठ परिसर या ठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे, असे दाखवले आहे. त्यात अनेक लोक बर्फामध्ये फिरताना दिसतात, ज्यामुळे दृश्य अधिक जिवंत भासते.