

कौलव : कोल्हापूर- राधानगरी राज्यमार्गालगत सिरसे गावानजीक संध्याकाळी सातच्या सुमारास दुरुस्तीसाठी आणलेली मारुती कार अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली . मुख्य रस्त्यावर द बर्निंग कारचा थरार रंगल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाले तर प्रवाशांचा भिती ने थरकाप उडाला .
याबाबत अधिक माहिती अशी की पुंगाव येथील एका व्यक्तीने आपली मारुती कार सिरसे येथे दुरुस्तीसाठी आणली होती . रस्त्यालगत लावलेल्या गाडीने अचानक पेट घेतली .अवघ्या काही क्षणातच आगीचे लोळ व धुराचे लोट उसळले. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांचा थरकाप वाहतूक काही काळ ठप्प झाली. भोगावती साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने तातडीने येऊन ही आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गाडीच्या वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून ही गाडी पुंगाव येथील एका व्यावसायिकाची असल्याचे समजते.