

Shiroli smashanbhumi incident
शिरोली पुलाची : शिरोली येथे स्मशानभूमीत अघोरी पूजा करणारा मांत्रिक किशोर लोहार व अभिजीत मोहिते यांची शिरोली पोलिसांनी गावातील मुख्य रस्त्यावरून सायंकाळी सहाच्या सुमारास धिंड काढली.
शिरोलीतील मांत्रिक किशोर मोहिते यांने २७ ऑक्टोबररोजी शिरोली स्मशानभूमीत अघोरी पूजा केली होती. यावेळी त्याच्यासोबत व्हिडिओ चित्रण करणारा अभिजीत मोहिते व कर्नाटकातील ज्याचा रोग बरा व्हावा, अशी व्यक्ती रमेश गावकर अशा तिघांनी रात्री बाराच्या सुमारास हा आघोरी पूजेचा प्रकार स्मशानभूमीत मांडला होता.
त्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली होती. त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गिरीश फोंडे यांनीही लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसानी त्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यांना वडगाव येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांनी हा प्रकार केल्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, रुग्ण रमेश गावकर अद्याप पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. दरम्यान या दोघांवर पोलिसांनी कारवाई करत आज गावातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढली. त्यामुळे रस्त्यावरील लोकांकडून या दोघांकडे आश्चर्यचकित नजरेने पाहिले जात होते.