Shirol Election cancelled | हरोली ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक अखेर रद्द; स्थानिक राजकारणात खळबळ

ग्रा.पं. सदस्य महावीर चौगुले हे वारस थकीत घरफाळा प्रकरणी सुमारे वर्षभरापूर्वी अपात्र ठरले होते
Election cancelled
Election cancelled pudhari photo
Published on
Updated on

Haroli Gram Panchayat Bye-Election

शिरढोण : हरोली (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक ४ साठी जाहीर करण्यात आलेली पोटनिवडणूक अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २८) होणारे मतदान न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे स्थगित झाल्याने महिनाभर तापलेले गावातील राजकीय वातावरण क्षणात शांत झाले.

वॉर्ड क्रमांक ४ चे सदस्य महावीर चौगुले हे वारस थकीत घरफाळा प्रकरणी सुमारे वर्षभरापूर्वी अपात्र ठरले होते. त्यांच्या रिक्त जागेसाठी एप्रिल महिन्यात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीसाठी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महावीर चौगुले यांच्यासह सर्व अर्ज वैध ठरवले होते.

Election cancelled
Kolhapur Airport News: कोल्हापूर विमानतळावर विमानाचे 'हार्ड लँडिंग'; ६४ प्रवाशांचा जीव टांगणीला, थोडक्यात बचावले

माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या रिंगणात महावीर बाळासो चौगुले आणि नेमिनाथ भाऊसो चौगुले हे दोन उमेदवार उरले होते. मात्र, उमेदवारीबाबत आक्षेप घेत नेमिनाथ चौगुले यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी २२ एप्रिल रोजी प्राथमिक सुनावणी झाली होती.

त्यानंतर २७ एप्रिल रोजी झालेल्या पुढील सुनावणीत उच्च न्यायालयाने पोटनिवडणूकच रद्द करण्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news