Kolhapur Drought | दुष्काळाची झळ आता गोठ्यापर्यंत; चारा पाण्याची टंचाई, दूध व्यवसायावर परिणाम शक्य

शिरढोण, टाकवडे, जांभळी, हरोलीसह संपूर्ण शिरोळ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती
Drought
DroughtAI Photo
Published on: 
Updated on: 

Shirol Drought Like Condition

बिरू व्हसपटे

शिरढोण : शिरढोण, टाकवडे, जांभळी, हरोलीसह संपूर्ण शिरोळ तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका शेतीबरोबरच पशुपालन व्यवसायालाही बसण्याची शक्यता आहे. पाणीपातळीत घट होत असल्याने जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि हिरवा चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान पशुपालकांसमोर उभे राहिले आहे.

शिरोळ तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास पशुखाद्यावरील खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यातच पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. जनावरांना पुरेसा चारा व पाणी न मिळाल्यास दूध उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम पशुपालकांच्या उत्पन्नावर होऊ शकतो.

Drought
Kolhapur Drought | कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांत आजपासून पंचनामे

सध्या तालुक्यात दूध उत्पादनात नेमकी किती घट झाली आहे, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे दूध संकलनातील बदलाकडे पशुपालकांसह प्रशासनाचे लक्ष लागले आहे. परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी संभाव्य चारा व पाणीटंचाईचा आढावा घेऊन पशुपालकांसाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

‘दुष्काळ जाहीर करावा’

“पावसाने ओढ दिल्याने हिरवा चारा आणि पाण्याची चिंता वाढली आहे. जनावरांचा सांभाळ करण्यासाठी चारा-पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास पशुखाद्य आणि इतर खर्चाचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने शिरोळ तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून पशुपालकांना आवश्यक मदत द्यावी,” अशी मागणी पशुपालक महेश गौराजे (शिरढोण) यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news