Kolhapur Adulterated Khava | आलासमध्ये ‘गौस पाकी खवा’ची पुन्हा चलती; पावडरमिश्रित खव्याची राजरोस विक्री

शिरोळ तालुक्यातील आलास परिसरात कथित पावडरमिश्रित खव्याची विक्री पुन्हा एकदा जोमात सुरू
 Shirol  Alas Powder Mixed Milk Khava
Shirol Alas Powder Mixed Milk KhavaAI photo
Published on
Updated on

Shirol Alas Powder Mixed Milk Khava

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील आलास परिसरात कथित पावडरमिश्रित खव्याची विक्री पुन्हा एकदा जोमात सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. गावातील तीन ते चार ठिकाणी हा खवा सहज उपलब्ध होत असून स्थानिक स्तरावर त्याला ‘गौस पाकी खवा’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील व्यवहारही याच नावाने होत असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, खवा खरेदीसाठी येणारे ग्राहक थेट ‘गौस पाकी खवा’ची मागणी करतात आणि त्यानुसार संबंधित खवा पुरविला जातो. गावात हा शब्दप्रयोग इतका प्रचलित झाला आहे की अनेक व्यवहारांमध्ये खव्याचे मूळ नाव न घेता केवळ ‘गौस पाकी’ अशीच मागणी केली जाते.

 Shirol  Alas Powder Mixed Milk Khava
Kolhapur St Bus news शिरढोणमध्ये सकाळची बससेवा बंद; विद्यार्थी,नोकरदार यांची गैरसोय; आंदोलनाचा इशारा

सध्या लग्नसराईचा हंगाम, धार्मिक कार्यक्रम, जत्रा-उत्सव तसेच विविध शुभकार्यांमुळे खव्याची मागणी वाढली आहे. मिठाई व्यावसायिक, आचारी, महाराज तसेच समारंभांचे ठेकेदार मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी आलासकडे वळत आहेत. परिणामी, येथून दररोज मोठ्या प्रमाणात खव्याची वाहतूक होत असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही संबंधित खव्याची विक्री सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत आणि निर्मिती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 Shirol  Alas Powder Mixed Milk Khava
Kolhapur crime प्रोसिडिंग गहाळ प्रकरणी ग्रामसेवकांवर पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे आदेश

संबंधित यंत्रणांनी उत्पादन केंद्रांची सखोल तपासणी करून खव्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सण-उत्सव, विवाह समारंभ आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या या खव्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अशा उत्पादनांची नियमित तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news