कोल्हापूर : शिरढोण येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाची जय्यत तयारी

कोल्हापूर : शिरढोण येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाची जय्यत तयारी
kolhapur news
कोल्हापूर : शिरढोण येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाची जय्यत तयारीPudhari photo
Published on
Updated on

शिरढोण : जैन धर्मियांचे श्रद्धास्थान श्री. १००८ भगवान आदिनाथ दिगंबर ऐतिहासिक पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव २ मार्च २०२५ ते ८ मार्च २०२५ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे असल्याची माहिती श्री. १००८ भ. आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. १३ वर्षानंतर याठिकाणी पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.

या महोत्सवासाठी प. पू. आचार्य श्री. १०८ धर्मसेनमुनी महाराज, प. पू. आचार्य श्री. १०८ जिनसेन मुनी महाराज, प. पू. आचार्य श्री. १०८ धर्मभूषण मुनी महाराज, प. पू. गणनी आर्यिका १०५, जिनदेवीमाताजी यांच्यासह संघ सानिध्यात संपन्न होणार आहे.

यासाठी भव्य दिव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. या कालावधीमध्ये जेवण व्यवस्था विभाग, सजावट विभाग, वाहन पार्किंग विभाग, बैठक व्यवस्था विभाग, प्रसिद्धी व्यवस्था विभाग, यासह विविध विभागामार्फत काम पाहण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये हत्ती, घोडे, रथ यांची भव्य मिरवणूक निघणार आहे. यासाठी काटेकोर नियोजन करत असल्याची माहिती अध्यक्ष कल्लाप्पा कोईक उपाध्यक्ष रावसो यमकनमर्डे व सर्व ट्रस्टी यांनी दिली.

यावेळी श्री. मद्देवाधिदेव १००८ भ. पार्श्वनाथ तीर्थंकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा, शिखरस्त श्री १००८ भ. पुष्पदंत तीर्थंकर प्रतिष्ठा द्वादश वर्ष, मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब प्रतिष्ठा त्रिद्वादश वर्ष, महामहोत्सव तथा श्री. पद्मावती मातेची मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे. तसेच विश्वशांती महायाग होणार आहे. यावेळी परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी नांदणी मठ, परमपूज्य स्वस्तश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर मठ, परमपूज्य डॉ.स्वस्तिश्री देवेंद्रकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी होम्बुज मठ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच प्रतिष्ठाचार्य श्री. पवन चंद्रनाथ उपाध्ये व सह प्रतिष्ठाचार्य श्री. जीनेंद्र श्रीकांत उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा विधी विधान संपन्न होणार आहे. तसेच सात दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये रविवार २ मार्च रोजी ध्वजारोहण गर्भ कल्याणक पूर्वार्ध, सोमवार ३ मार्च रोजी गर्भकल्याणक उत्तरार्ध नवग्रह शांती विधान, मंगळवार ४ मार्च रोजी भगवत जन्मकल्याणक, बुधवार दिनांक ५ मार्च रोजी राज्याभिषेक दीक्षा कल्याणक भोगातून तपाकडे, तर गुरुवार ६ मार्च रोजी केवलज्ञान कल्याणक, भगवंताचे आहारविधी मूर्तीस्थापना व मौजी बंधन कार्यक्रम होणार आहे.

शिवाय शुक्रवार ७ मार्च रोजी समवशरण रचना व भव्य रथोत्सव होणार आहे. शेवटी शनिवार ८ मार्च रोजी निर्वाण कल्याण शाश्वत मोक्ष मार्ग अशा स्वरूपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सौधर्म इंद्र इंद्राणी यांना हत्तीवरून मिरवणूक काढून त्यांच्या निवासस्थानी सोडण्यात येणार आहे.

तब्बल १३ वर्षानंतर पंचकल्याण महामहोत्सव होणार साजरा

तब्बल १३ वर्षानंतर याठिकाणी पंचकल्याण महामहोत्सव साजरा होत आहे. २०११ साली येथे भव्य दिव्य असा पंचकल्याण सोहळा पार पाडण्यात आला होता. दरम्यान या महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री मज्जीनेंद्र पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव समिती, समस्त श्रावक श्राविका श्री शांतिसागर पाठशाळा, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, धर्मवीर झांज पथक, तसेच गावातील सर्व युवक मंडळ ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत.

प्रशासन सतर्क....

शिवणाकवाडी येथील यात्रेत झालेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग, अन्नप्रशासन विभाग सतर्क झाला आहे. होणाऱ्या पंचकल्याण महोत्सवात काळजी घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने संबधिताना सूचना देण्यात आल्या आहेत. बैठका घेण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news