कोल्हापूर : मेंढपाळचा मुलगा झाला आयपीएस !

Birdev Done : कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी
UPSC Result
बिरदेव डोणे.pudhari photo
Published on
Updated on

मुरगूड : २०२४ मध्ये केंदीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे येथील सिद्धाप्पा डोणे या मेंढपाळाचा मुलगा बिरदेव हा अवघ्या २७ व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात ५५१ रँकने उत्तीर्ण झाला. त्यामुळे बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी बनणार आहे.

२०२४ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) दुपारी जाहिर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थितीत जल्लोष करण्यात आला.

बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदीर या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झाले . उच्च माध्यमिक शिक्षण मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले तर इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सीओईपी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर बिरदेवने दिल्लीमध्ये आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरु ठेवले होते. याठिकाणी त्याने दिवसातून २२ तास अभ्यास करत परीक्षेची तयारी केली. दिल्लीमध्ये ने कस्ट आयएएस आणि वाझराम क्लासेस याठिकाणी परीक्षेसंबधी मार्गदर्शन घेतले . परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले.

या परीक्षेचा निकाल आज समजताच यमगे येथे त्याच्या मित्रपरिवाराने एकच जल्लोष केला सध्या बिरदेव हा बेळगाव जिल्हयात मामाच्या गावी गेला आहे . बिरदेवचे वडिल सिद्धापा डोणे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले आहे . त्यांनी परिस्थिती बेताची असतानाही मेंढपाळ व्यवसाय करीत आपला मुलगा बिरदेव याला उच्चपदस्थ अधिकारी बनविण्याच्या उद्देशाने शिक्षण दिले.

बिरदेवचा भाऊ वासुदेव डोणे हा चार वर्षापूर्वी भारतीय सैन्यात भरती झाला आहे त्यामुळे बिरदेवच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळू शकली. आई बाळाबाई , विवाहित बहिण , भाऊ व वडिल असे कुटूंब आहे.

दहावी बारावीला केंद्रात प्रथम

बिरदेव हा सुरुवातीपासूनच हुशार होता. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये मुरगूड केंद्रात सर्वप्रथम आला होता . गणित विषयात त्याला या दोन्ही परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते.

अशीही जिद्द

इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेताना बिरदेवने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभागी झाला होता. पण त्यामध्ये अपयश आल्याने त्याने खचून न जाता मोबाईल टीव्ही व खेळ यापासून अलिप्त रहात जिद्दीच्या जोरावर केवळ अभ्यासाला महत्व दिले.

आयपीएस होणारच !

बिरदेव दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करत होता. महिन्याला दहा-बारा हजार रुपये त्याला खर्चासाठी पाठवणे वडिलांना कठीण होत चालले होते. त्यामुळे हा नाद सोड आणि एखादी नोकरी कर असा तगादा वडिलांनी बिरदेवकडे लावला होता. मात्र यूपीएससी परीक्षेत यशस्वी होणारच ही जिद्द बिरदेवने बोलून दाखवली होती.

यशाची पक्की खात्री

अलीकडेच काही दिवसापूर्वी माझे ध्येय अंतिम टप्प्यात आले आहे. इंटरव्यू झाला आहे. निवड निश्चित आहे. कोणाला याबाबत लगेच सांगू नको, अशी माहिती बिरदेवने नेव्हीत असलेला आपला गावकरी मित्र यश घाटगे याला दूरध्वनी वरून दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news