Kolhapur ZP Election | शाहूवाडीत जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी २०९ मतदान केंद्रावर मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Shahuwadi News | मतदान साहित्याचे वितरण, १३८० कर्मचारी २०९ केंद्रावर दाखल
Shahuwadi ZP Panchayat Samiti Voting
निवडणूक कर्मचारी ईव्हीएम मशीन आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन आपापल्या नियोजित स्थळी रवाना झाली.Pudhari
Published on
Updated on

Shahuwadi ZP Panchayat Samiti Voting

सुभाष पाटील

विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी उद्या, शनिवारी (७ फेब्रुवारी) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, आज (दि.६) रोजी तहसील कार्यालयाच्या जुन्या गोडाऊन येथे मतदान साहित्य वाटप करण्यात आले. २०९ मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसह १३८० नियुक्त कर्मचारी दुपारी साडेबारा वाजता ईव्हीएम मशीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन आपापल्या नियोजित स्थळी रवाना झालीत.

जिल्हा परिषदेच्या ४ जागेसाठी १३ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ८ जागेसाठी १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. तालुक्यात एकूण १ लाख ५९ हजार १२३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून २०९ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे, प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी कार्यरत राहतील. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण १३८० जणांचा मोठा स्टाफ तैनात करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने चार स्थिर पथके आणि चार भरारी पथकांचा सक्त पहारा राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांनी दिली.

Shahuwadi ZP Panchayat Samiti Voting
Kolhapur Superstition News | सरूड-शिंपे मार्गावर 'करणी'चा प्रकार; लिंबू, नारळ आणि हळद-कुंकवाचा सडा पाहून दहशतीचे वातावरण

६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाच्या जुन्या गोडावूनमधून मतदान पथकांना साहित्याचे वाटप करण्यात आले यासाठी २० टेबलची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील केंद्रांवर पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाच्या ३१ बसेस आणि ९ खाजगी जीप वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. या वाहनांद्वारे ही पथके आपापल्या केंद्रांकडे रवाना झालीत. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार आहे.

प्रशासनाचे आवाहन

निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सीमा सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना घराबाहेर पडून शांततेत आणि निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. "मतदान हा आपला हक्क असून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने यात सहभाग नोंदवावा," असे शिंगण यांनी स्पष्ट केले.

Shahuwadi ZP Panchayat Samiti Voting
kolhapur | अंधत्वावर मात करण्यासाठी कोल्हापुरातील संशोधकांनी विकसित केले ‘कृत्रिम नेत्रपटल’

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडूनही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ​उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होणार असून, तालुक्यात कोणाचे पारडे जड ठरणार आणि मतदार कोणाच्या पदरात कौल टाकणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. एकंदरीत मतदानाकडे आणि त्यानंतर लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​ निवडणूक एका नजरेत:

​ एकूण मतदार: १,५९,१२३

​ मतदान केंद्रे: २०९

​ एकूण कर्मचारी: १३८०

​जि.प. जागा/उमेदवार: ४ / १३

​पं.स. जागा/उमेदवार: ८ / १९

मतदान हा आपला हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने शांततेत व निर्भयपणे मतदान करावे.

— वर्षा शिंगण, निवडणूक निर्णय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news