Shahuwadi Gram Panchayat Award | ‘शाहूवाडी’त ५८ ग्रामपंचायतींचा 'क्षयमुक्त' पुरस्काराने गौरव

​'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ; लोकप्रतिनिधी आणि आरोग्य प्रशासनाचा पुढाकार
TB Free Gram Panchayat Award
शाहुवाडी पंचायत समिती सभागृहात 'क्षयमुक्त' पुरस्कार गौरव प्रसंगी बोलताना उपसभापती अमरसिंह खोत, शेजारी सभापती प्रियांका भोसले, डॉ. हर्षला वेदक, मंगेश कुचेवार, डॉ. एच. आर. निरंकारी आदीPudhari
Published on
Updated on

TB Free Gram Panchayat Award

​ विशाळगड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 'खेड्यांकडे चला' आणि 'स्वच्छतेतून समृद्धी' या कालजयी विचारांना अनुसरून, शाहुवाडी पंचायत समितीने आरोग्याच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. 'क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियान' आणि 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' मोहिमेअंतर्गत तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५८ ग्रामपंचायतींना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात आले.

पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या सोहळ्याची सुरुवात सभापती प्रियांका भोसले, उपसभापती अमरसिंह खोत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आरोग्यदूतांच्या अहोरात्र सेवेचे कौतुक केले.

TB Free Gram Panchayat Award
Shahuwadi Crop Damage | वन्यप्राण्यांचा 'रात्रीस खेळ', शिरगावमध्ये मका पीक रातोरात जमीनदोस्त

क्षयमुक्तीच्या कठोर निकषांची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींना महात्मा गांधीजींचा पुतळा आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले:

यामध्ये गोल्ड (सुवर्ण) प्रमाणपत्र : आंबा, केर्ले, करंजफेन, माळापुडे, कातळेवाडी या ५ गावांनी सुवर्ण यश संपादन केले.

सिल्वर (रौप्य) प्रमाणपत्र : १९ ग्रामपंचायती (आळतुर, पुसार्ले, भेडसगाव, हारुगडेवाडी, नेर्ले, चरण, सरुड, कापशी, कासार्डे, वालुर, उखळू, विरळे, सोनुर्ले, मरळे, शित्तुर तर्फ मलकापूर, खोतवाडी, भाडळे, शिराळे तर्फ मलकापूर, ऐनवाडी), ​

ब्रॉन्झ (कांस्य) प्रमाणपत्र : ३४ ग्रामपंचायती अशा एकूण ५८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

प्रास्ताविकात डॉ. निरंकारी यांनी तालुका पूर्णपणे क्षयमुक्त करण्याचा आरोग्य विभागाचा निर्धार व्यक्त केला. डॉ. हर्षला वेदक यांनी तांत्रिक मार्गदशन केले, तर सभापती प्रियांका भोसले यांनी "आरोग्यसंपन्न गाव हीच खऱ्या अर्थाने विकासाची नांदी आहे" असे सांगून सरपंचांना गाव स्वयंपूर्ण करण्याचे आवाहन केले. या सोहळ्याला तालुक्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यसंपन्न गाव हीच खऱ्या अर्थाने विकासाची नांदी आहे. क्षयमुक्तीच्या या लढ्यात सरपंच, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे.

प्रियांका भोसले (सभापती, पं. स. शाहुवाडी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news