Kolhapur News : ‘एक दिवस आड...‌’ भूमिकेने दुसऱ्या दिवशीही गूळ सौद्ये बंद

माथाडी कामगारांच्या अचानक निर्णयामुळे व्यवहार पूर्ण ठप्प
Kolhapur Market Yard
Kolhapur Market Yard
Published on
Updated on

कोल्हापूर : शाहू मार्केट यार्डात माथाडी कामगारांनी ‌‘एक दिवस आड काम‌’ करण्याची भूमिका घेतल्यामुळे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही गुळाचे सौदे झाले नाहीत. सुमारे 16 गाड्यांची आवक रोखण्यात आली असून, या गुळाचे सौदे आता बुधवारी (दि. 8) करण्याचे ठरविण्यात आले आहे.

कोल्हापुरातून गुजरातला पाठवण्यात आलेल्या काही गुळामध्ये रासायनिक रंग आढळल्याने तेथील अन्न व औषध प्रशासनाने काही व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांनी कोल्हापुरातून गूळ खरेदी तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, स्थानिक गूळ व्यापाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी गूळ सौद्यांना चार तास उशीर झाला होता.

दरम्यान, आज पुन्हा माथाडी कामगारांनी अचानक ‌‘एक दिवस आड काम‌’ करण्याची भूमिका घेतल्याने व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. सुमारे 12 गाड्या लहान गुळाच्या रव्याने भरून सौद्याच्या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या. व्यापारी व शेतकरी उपस्थित होते; मात्र माथाडी कामगार अनुपस्थित राहिल्याने सौदे सुरूच होऊ शकले नाहीत.

अखेर व्यापारी, शेतकरी व बाजार समितीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन बुधवारी गूळ सौदे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत गाड्या सुरक्षित ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी पेच निर्माण झाला होता. माजी सभापती भारत पाटील व सचिव तानाजी निकम यांनी बाजारपेठेत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि व्यापारी व शेतकऱ्यांची समजूत काढत बुधवारी सौदे सुरळीत पार पडतील, असा विश्वास दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news