Kolhapur News : शहापुरात ५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक
Kolhapur News
शहापुरात ५ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त
Published on
Updated on

यड्राव : शहापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून ५ लाख ४ हजार रुपये किमतीचे २८ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केलेे. याप्रकरणी पिंटू ऊर्फ धनाजी पांडुरंग जाधव (३४, रा. कारंडे मळा, शहापूर, इचलकरंजी) व सिद्धार्थ बडे (रा. इचलकरंजी) या दोघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पिंटू जाधवला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शहापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा केली. याबाबतची फिर्याद सहा. फौजदार अविनाश रामचंद्र मुंगसे यांनी दिली आहे. संशयित पिंटू ऊर्फ धनाजी जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो १४ सप्टेंबर २०२६ पासून तालुक्यातून हद्दपार आहे. त्याच्यावर शहापूर, पन्हाळा आदी ठिकाणी खून, दरोडा, मारामारी अशा प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news