Indian Forest Service | भारतीय वन सेवा परीक्षेत कोल्हापूरचे सात विद्यार्थी चमकले

अंतिम निकाल जाहीर; देशभरातून 148 जणांची निवड
Indian Forest Service |
Indian Forest Service | भारतीय वन सेवा परीक्षेत कोल्हापूरचे सात विद्यार्थी चमकले
Published on
Updated on

कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय वन सेवा परीक्षा 2025चा अंतिम निकाल जाहीर केला. देशभरातून 148 उमेदवारांची निवड करण्यात आली. यात कोल्हापूरच्या ओंकार फडतरे (रँक 30), मोहिनी जगताप (46), रोहित मालवेकर (62), ओंकार जाधव (57), रोहित पवार (69), अक्षय पवार (81), प्रतीक कुशारे (100) यांनी यश मिळविले.

आयएएस व आयपीएसच्या बरोबरीने आयएफएस ही मात्र तिसरी ऑल इंडिया सर्व्हिस म्हणून गणली जाते. पूर्व परीक्षा 25 मे 2025 रोजी घेण्यात आली. लेखी परीक्षा 16 ते 23 नोव्हेंबर दरम्यान झाली. लेखी परीक्षेत यशस्वी उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी बोलावण्यात आले. मुलाखत प्रक्रिया 6 ते 15 एप्रिल 2026 कालावधीत झाली. लेखी परीक्षा व मुलाखतीतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. नुकताच परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यात बसवराज केमपावड यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला. टॉप-10 यशस्वी उमेदवारांमध्ये केवळ एका महिला उमेदवाराचा समावेश आहे, अशी माहिती विद्या प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news