Kolhapur second division bench | कोल्हापुरात दुसर्‍या डिव्हिजन बेंचला मंजुरी

4 मार्चपासून कामकाज सुरू; खंडपीठ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
Kolhapur second division bench |
Kolhapur second division bench | कोल्हापुरात दुसर्‍या डिव्हिजन बेंचला मंजुरी
Published on
Updated on

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये शनिवारी (दि. 28) दुसर्‍या डिव्हिजन बेंचला मंजुरी मिळाली. 4 मार्चपासून या बेंचचे कामकाज आठवड्यातून तीन दिवस सुरू राहील. या डिव्हिजन बेंचसमोर 2020 नंतरच्या दिवाणी याचिका, 2021 नंतरच्या फौजदारी याचिका व 2010 नंतरच्या फौजदारी अपिलांचे काम चालणार आहे. कोल्हापूर येथे खंडपीठ होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

कोल्हापूरमध्ये 18 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर झाले. यानंतर कोल्हापूर खंडपीठाची मागणी जोर धरू लागली. सर्किट बेंचचे खंडपीठ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचा पाठपुरावाही सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत दोन नवीन स्वतंत्र न्यायमूर्तींची नियुक्ती केल्यामुळे सर्किट बेंचचा आणखी विस्तार झाला. शनिवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दुसर्‍या डिव्हिजन बेंचला मंजुरी मिळाली. न्यायमूर्ती रणजिसिंह राजा भोसले यांच्यासह न्यायमूर्ती वृषाली जोशी हे डिव्हिजन बेंच दोनचे काम पाहणार आहेत. सर्किट बेंचच्या तिसर्‍या मजल्यावरील रूम नंबर 5 मध्ये या बेंचचे कामकाज चालणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या बेंचचे काम सुरू राहणार आहे.

दोन महिन्यांत कोल्हापूर सर्किट बेंचचा दुसर्‍यांदा विस्तार

मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य पीठ येथे कार्यरत असलेले न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती रणजिसिंह राजा भोसले यांच्यासह नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती प्रवीण पाटील, औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती सचिन देशमुख हे सर्किट बेंचमध्ये येणार आहेत. दुसर्‍या डिव्हिजन बेंचच्या मंजुरीमुळे कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आता 2 डिव्हिजन बेंच आणि चार सिंगल बेंच निर्माण झाले आहेत. पहिल्या डिव्हिजन बेंचचे कामकाज न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमोर चालणार आहे; तर न्यायमूर्ती वृषाली जोशी या सिंगल बेंच 1, न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये हे सिंगल बेंच 2, न्यायमूर्ती सचिन देशमुख सिंगल बेंच 3, तर न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले हे सिंगल बेंच 4 चे कामकाज पाहणार आहेत. गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर सर्किट बेंचचा दुसर्‍यांदा विस्तार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news