गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेममध्ये रायफल शूटिंग थ्री पोझिशन या क्रीडा प्रकारात येथील सानिया सुदेश सापळे हिने कांस्यपदक पटकाविले.
सानिया रायफल शूटिंग मध्ये गेली चार वर्षे देदीप्यमान कामगिरी करत आहे. यापूर्वी तिची चांगली कामगिरी केल्याबद्दल भारतीय जुनियर रायफल शूटिंग संघात निवड करण्यात आली होती. सानियाला कोच सद्गुरुदास, इंद्रजीत मोहिते, रोहित हवालदार, रत्नाकर देसाई, राधिका बराडे यांचे मार्गदर्शन लागले.
हेही वाचा