Kolhapur Accident | कोल्हापूर-सांगली महामार्गावर हालोंडी येथे अपघातात इचलकरंजीचा एक ठार!

हालोंडी जवळ अपघातात ठार झालेल्या सुनील कुमार होनुर्ले
हालोंडी जवळ अपघातात ठार झालेल्या सुनील कुमार होनुर्ले
Published on
Updated on

नागाव;- कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हालोंडी (ता. हातकणंगले) येथील खाऊ गल्लीसमोर दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील लालनगर परिसरातील एक ठार झाला हा अपघात शनिवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. सुनील कुमार होनुर्ले (वय ४०, रा. लालनगर, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे.

तो सेंट्रिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांची पत्नी गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूर येथील मंगळवार पेठेत माहेरी राहत आहे. त्याला दोन मुले असून मोठा मुलगा आठवीत तर मुलगी सहावीच्या वर्गात शिकत आहे.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच ठिकाणी चार-पाच महिन्यांपूर्वी एका मालवाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीने वळण घेताना एका दुचाकीस्वारास उडवले होते, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या भागातील व्यावसायिकांच्या सोयीसाठी डिव्हायडर फोडून परस्पर रस्ता तयार करण्यात आला आहे.

या अनधिकृत डिव्हायडर फोडून या केल्या कटींगमुळे यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात होऊन काही जण जखमी झाले आहेत, तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा जीवघेणा प्रकार करणाऱ्या व्यावसायिकाना दोषी धरायाचे कि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या रस्ते विकास प्रशासनाला धरायचे, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news