

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानावर गेले सहा दिवस सुरू असणार्या आंदोलनाला मंगळवारी यश आले. याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यासमोर फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ‘एक मराठा - लाख मराठा’, ‘जरांगे-पाटील तुम आगे बढो - हम तुम्हारे साथ है...’ अशा घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा व बहुजन समाजासाठी सक्रिय असणार्या सर्व संस्था-संघटना एकवटल्या असून या एकजुटीचा वापर बहुजन समाजाच्या विकासासाठी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आनंदोत्सवात वसंतराव मुळीक, अश्विनकुमार वागळे, चंद्रकांत पाटील, उमेश पवार, संदीप देसाई, रुपेश पाटील, पै. बाबा महाडिक, राजू सावंत, शाहीर दिलीप सावंत, सुनीता पाटील, सुवर्णा मिठारी, सुधा सरनाईक, शिवराज गायकवाड, शशिकांत पाटील, नीलेश चव्हाण, अवधूत पाटील, संपत चव्हाण-पाटील, शंकराव शेळके, जाफरबाबा, कादर मलबारी, अशपाक आजरेकर, चंद्रकांत चव्हण यांच्यासह मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, राजमाता जिजाऊ बि—गेड, स्वाभिमानी संभाजी बि—गेड, मावळा कोल्हापूर, मराठा समाज सेवा संघटन, संभाजी बि—गेड, जिजाऊ बि—गेड, सह्याद्री फाऊडेशन, महाराष्ट्र क्रांती सेना, छावा संघटना, छत्रपती शाहू प्रतिष्ठान, मराठा रियासत, शिव शाहू पोवाडा मंच कोल्हापूर, विश्वशाहीर परिषद, मराठा योद्धा, कोल्हापूर सकल मराठा परिवार, मुस्लिम बोर्डिंग, राजर्षी शाहू सलोखा मंच या संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.