kolhapur | आधी रोकड भरा, मगच पेट्रोल घ्या

kolhapur | आधी रोकड भरा, मगच पेट्रोल घ्या
kolhapur | आधी रोकड भरा, मगच पेट्रोल घ्या
Published on
Updated on

कोल्हापूर : इराण आणि इस्रायलमध्ये लांबलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह ग्रामीण भागात पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र या रांगा बदललेली क्रेडिट सिस्टीम आणि दोन दिवसांचा बँक हॉलिडे यामुळे लागल्याचे सांगण्यात आले.

या गोंधळाचे मुख्य कारण म्हणजे तेल कंपन्यांनी बदललेली ‘क्रेडिट सिस्टीम’ आहे. सोमवार, दि. 16 मार्चपासून इंडियन ऑईल, एचपी आणि बीपीसीएल या कंपन्यांनी 5 दिवसांची क्रेडिट सवलत बंद करून ‘रोख रक्कम’ भरण्याचे बंधन घातले आहे. त्यातच शनिवारी ईद आणि रविवारी बँकांना सुट्टी असल्याने अनेक पंप चालकांचे बँकिंग व्यवहार थांबले होते. यामुळे इंधनाचे पैसे भरण्यास विलंब झाला आणि काही पंपांवरील साठा संपल्याने ‘नो स्टॉक’चे फलक लागले.

कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी स्पष्ट केले की, इंधनाचा तुटवडा नाही, केवळ पेमेंट सिस्टीममध्ये बदल झाल्याने काही पंपांना पुरवठा होण्यास उशीर झाला आहे. दोन तेल कंपन्यांनी पूर्वीच्या वापराप्रमाणे कोटा निश्चित करून दिला असून, सर्व पंपांना पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news