Kolhapur : निवृत्त पोलिसाचा बंगला फोडून 15 तोळे सोने लंपास

गडहिंग्लज तालुक्यात नांगनूरमधील घटना
Robbery Case
निवृत्त पोलिसाचा बंगला फोडून 15 तोळे सोने लंपास File Photo
Published on
Updated on

नूल : खिडकीचे गज वाकवत बंद असलेल्या बंगल्यात प्रवेश करून चोरट्यांनी 15 तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपये चोरून नेले. नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे सेवानिवृत्त पोलिस हवालदार नाना निंगाप्पा बामणे यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला. बामणे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

बामणे हे पोलिस दलातून हवालदारपदावरून 2018 मध्ये निवृत्त झाले. दोन मुली तेजल व काजल या शिक्षणानिमित्त बाहेर गावी असतात. गावच्या यात्रेसाठी बामणे कुटुंबीय 4 मे रोजी नांगनूर येथे आले होते. सोमवारी बामणे यांच्यावर गडहिंग्लज येथे हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यासाठी पती, पत्नी दवाखान्यात मुक्कामी होते. त्यामुळे घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला. बेडरूम व मागील खोलीत असलेल्या दोन तिजोर्‍या बनावट चाव्यांनी उघडल्या. कपाटातील कपडे, कागदपत्रे विस्कटून टाकले. त्यातील मंगळसूत्र, चेन, कर्णफुले, अंगठी, हार असा 15 तोळे सोन्याचा ऐवज व रोख 20 हजार रुपयांवर डल्ला मारला. शेजारी श्रीराम पाटील यांनी मोबाईलवरून नंदा बामणे यांना पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्या घरी आल्यानंतर चोरीचा उलगडा झाला. पोलिसपाटील ज्ञानदेव मोकाशी यांनी पोलिसांना माहिती दिली. कोल्हापूरहून आलेले श्वानपथक मुख्य रस्त्यापर्यंत घुटमळले. ठसेतज्ज्ञांनी वस्तूंचे ठसे घेतले.

मोठ्या चोरीचा तिसरा प्रकार

नांगनूर येथील राम मंदिर, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे. त्याचा मागमूस अद्याप लागलेला नाही, तोपर्यंत चोरीचा हा तिसरा प्रकार घडला आहे. वटपौर्णिमेच्या आदल्या रात्री सर्वच दागिने चोरीस गेल्याने नंदा धाय मोकलून रडत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news