Kolhapur Rainfall | ‘फर्स्ट हाफ’मध्ये पावसाची आक्रमक खेळी; ‘सेकंड’मध्ये डिफेन्स मोडवर!

जिल्ह्यात १२ दिवसांत सरासरीपेक्षा ११५ टक्के पाऊस; बरसला ३०६ मि.मी.
Kolhapur Rainfall
Kolhapur Rainfall | ‘फर्स्ट हाफ’मध्ये पावसाची आक्रमक खेळी; ‘सेकंड’मध्ये डिफेन्स मोडवर!pudhari photo
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : यंदा जुलै महिन्याच्या ‘फर्स्ट हाफ’ मध्ये मान्सून दमदार बरसला. मात्र, आता दुसऱ्या हाफमध्ये तो ‘डिफेन्स मोड’मध्ये गेल्याचे दिसत आहे. रविवार (दि. 12) पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 306.9 मि.मी. पावसाची नोंद झाली. जुलैच्या पहिल्या 12 दिवसांची जिल्ह्याची सरासरी 265.4 मि.मी. आहे. यंदा या सरासरीच्या 115.6 टक्के म्हणजेच 306.9 मि.मी. पाऊस झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने आता दडी मारली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, कोल्हापूरसह राज्याच्या बहुतांश भागात 20 जुलैपर्यंत पाऊस 'ब्रेक' घेणार असून, त्यानंतर मान्सूनची हळूहळू पुनरागमन होईल.

कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण जुलै महिन्याची सरासरी 685.5 मि.मी. आहे. यंदा पहिल्या 12 दिवसांतच 306.9 मि.मी. पाऊस झाल्याने महिन्याच्या सुरुवातीला पावसाने चांगली भर घातली. मात्र, आता पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे जुलैच्या उर्वरित कालावधीत किती पाऊस होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अल निनोचा वाढता प्रभाव, मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) प्रतिकूल अवस्थेत असणे, बंगालच्या उपसागरात प्रभावी कमी दाबाची प्रणाली तयार न होणे आणि इतर जागतिक हवामान घटकांमुळे मान्सूनची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे 20 जुलैपर्यंत मान्सून ब्रेक अवस्थेत राहील आणि त्यानंतरही जुलैअखेरपर्यंत तो तुलनेने कमकुवत राहण्याचा अंदाज आहे.

अथ्रेय शेट्टी, हवामान तज्ज्ञ, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news