

Kolhapur to Ratnagiri Jotiba route open
कोल्हापूर : कासारी नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे केर्ली नजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग शिवाजी पूल येथे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तथापि, केर्ले ते केर्ली दरम्यानचा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे हा मार्ग अद्याप बंदच आहे.
वाहतूक शिवाजी पूल - केर्ली - जोतिबा रोड - वाघबिळ - रत्नागिरी या मार्गाने सुरु आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कोल्हापूर (NHAI) मुख्य प्रकल्प संचालक गोविंद बैरवा यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी (दि.२१) सकाळी पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली होती. परंतु, आज सकाळी पाणी पातळी कमी झाली आहे. पावसाचा जोर ओसरल्याने काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले. नदीच्या पाणीपातळीत संथगती घसरण सुरू आहे. कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील पाणी ओसरल्याने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४२ फुटांवर पोहोचली आहे. गुरूवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे काही भागांत सूर्यदर्शन झाले.