Kolhapur rain Radhanagari dam gates open latest update
कोल्हापूर: गणेशोत्सवाच्या धामधुमीतच राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. या दरवाजांमधून होणारा ७१४० क्युसेक्स आणि वीजगृहातून १५०० क्युसेक्स असा एकूण ८६४० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली होती. त्यामुळे मध्यरात्री १२.४९ ते १.०५ वाजण्याच्या सुमारास धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. यानंतर भोगावती नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाली.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत धरण परिसरात ९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यासह धरणाचा जूनपासूनचा एकूण पाऊस ४९५६ मिमी इतका झाला आहे. भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पडळी पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी, प्रसिद्ध राऊतवाडी धबधब्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने, पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऋषिपंचमीच्या पवित्र मुहूर्तावर, हजारो भाविकांनी आज पहाटेपासूनच नाशिकच्या गोदावरी तीरावरील रामकुंडावर स्नानासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र, दुसरीकडे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, श्रद्धेच्या या वातावरणात प्रशासनाने भाविकांना सुरक्षिततेचा गंभीर इशारा दिला आहे. गंगापूर धरणातून 3025 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाकडून भाविकांना पाण्याजवळ न जाण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात गेली दोन दिवस पाऊस सुरू आहे. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी, कणकवली, वेंगुर्ला याच्यासह अन्य तालुक्यांमध्ये गेली दोन दिवस पाऊस सुरूच आहे. सर्वाधिक 172 मिलिमीटर पाऊस दोडामार्गमध्ये झाला असून त्यानंतर सावंतवाडी वैभववाडी या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा बाजारपेठेत काही सकल भागात पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. असाच पाऊस सुरू राहिला तर पूरजन्यपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस 89.39(mm)
१) देवगड 20
२) मालवण 48
३) सावंतवाडी 140
४) वेंगुर्ला 79
५) कणकवली 36
६) कुडाळ 109
७)वैभववाडी 111
८) दोडामार्ग 172