Kolhapur Rain|भूदरगड : फये प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

सांडव्यावरून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग
bhudargad faye project
फये प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाbhudargad faye project
मिणचे खुर्द

भुदरगड तालुक्यातील फये लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रकल्प क्षेत्रात पाऊस झाल्याने ३३.४२ मीटर उंची व ३५५.६५ मीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाची १३८.८८ दशलक्ष घनफूट पाणी साठवणूक क्षमता आहे. प्रकल्पात पूर्ण पाणीसाठा झाला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Kolhapur Rain)

bhudargad faye project
Kolhapur Rain Updates : चांदोली धरणाचे दोन दरवाजे उघडले

प्रकल्पांतर्गत ९७२ हेक्टर लाभक्षेत्र असून सिंचन क्षेत्र ७०० हेक्टर आहे. शेतीच्या पाण्यासाठी मोर ओहोळेवर बारा बंधारे बांधण्यात आलेले आहेत. प्रत्येक वर्षी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. यावर्षी प्रकल्पात उशीरा पाणीसाठा करण्यात आला तसेच शेतीसाठी आवर्तने जादा देण्यात आली होती. त्यामुळे पाणीटंचाई भासली नव्हती. सध्या हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभक्षेत्रातील बळिराजा सुखावला आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

bhudargad faye project
Kolhapur Panhala road : कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील वाहतूक वळवली

फये प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून १०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

bhudargad faye project
Kolhapur Rain : गडहिंग्लज-चंदगड थेट संपर्क पुन्हा तुटला

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news