कोल्हापूर : राधानगरी-निपाणी मार्ग वाहतुकीसाठी बंद

निढोरी मुरगुड दरम्यान रस्त्यावर महापुराचे पाणी
Radhanagari-Nipani road closed
राधानगरी-निपाणी मार्ग बंद करण्यात आला आहे.Pudhari News Netwok
Published on: 
Updated on: 

मुदाळतिट्टा : सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला असून वेदगंगेच्या पुराचे पाणी राधानगरी निपाणी या महत्त्वाच्या राजमार्गावर आले आहे. निढोरी मुरगूड दरम्यान असणाऱ्या स्मशान शेडनजीक रस्त्यावर अंदाजे तीन फुट पाणी आल्याने येथून होणारी वाहतूक बंद पुर्णपणे झाली आहे. मुरगूड स्मशान शेड ते पेट्रोल पंप असे अर्धा किलोमीटर अंतरावर रस्त्यावर पाणी आहे. मुरगुडच्या सर पिराजी तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने येथून होणारी वाहतुकही बंद झाली आहे.

वेदगंगा नदीला महापूर आल्याने नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली आहेत. गेले आठ दिवस तेथून होणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. सध्या निढोरी मुरगूड मार्गावर वाहतूक बंद असल्याने पर्यायी मुरगुड चिमगाव गंगापुर मडिलगे कुर या मार्गे गारगोटी-कोल्हापूर अशी वाहतूक सुरू आहे. निढोरी कागल मार्गे वाहतुकीसाठी खुला आहे. मुरगुड निपाणी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे.

मुरगुड सेनापती कापशी मार्गावर असणारा सर पिराजी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. मुरगूड कापशी मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मुरगूडहून कापशीला जाण्यासाठी चिमगाव अवचित वाडी बोलावी, बोलावी वाडी, बेलेवाडी मार्गे कापशी असा पर्यायी मार्ग सुरू आहे.

मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच असल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पत्रात झपाट्याने वाढ होत आहे. वेदगंगाचीपाणी पातळी धोक्याच्या इशाराकडे जात आहे. मुरगुड पोलिसांनी दिंडोरी येथे व मुरगूड येथे वाहने अडवून ट्रॅक्टर रस्त्याच्या आडव्या उभे करून बॅरिकेट लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे . गेले दहा दिवस वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर असल्याने पाण्याखालची पिके कुजून गेली असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.