

Kolhapur Heavy Rain
राधानगरी : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या दमदार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात झापाट्याने वाढ होत आहे. धरण 95 टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी स्थिर असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दोन फूट पाणी कमी आहे. आठवडा भरात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
राधानगरी धरणातील पाणीसाठा आणि पावसाळ्यातील पाण्याची संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून गेले 33 दिवस उघडण्यात आलेले धरणाचे सर्व्हिस गेट दोन दिवसापूर्वी बंद करण्यात आले आहेत. सध्या धरणातून खासगी वीज निर्मितीसाठी 1500 क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.
आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 53 मिमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर 2981 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातून वीजनिर्मितीसाठी 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये होत आहे. धरणात 7.95 टीएम सी इतका पाणी साठा असून पाणी पातळी 345.36 फूट इतकी झाली आहे. 347.59 फूट पाणी पातळीला धरण पूर्ण क्षमतेने भरते.