

कोल्हापूर : दसरा-दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. शहराच्या रिअल इस्टेट विश्वात विश्वासार्ह मानल्या गेलेल्या ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे आयोजन १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. असेंब्ली रोडवरील हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसुदन हॉलमध्ये हे तीन दिवसीय भव्य प्रदर्शन भरणार असून ‘रामसिना ग्रुप’ या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.
सध्या कोल्हापूर आणि लगतच्या उपनगरांमध्ये पायाभूत सुविधांचा वेगवान विकास होत असल्याने घर आणि जागा खरेदीसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जात आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या थेट भेटीतून सर्वोत्तम दर, सणासुदीच्या विशेष सवलती आणि सुरक्षित गुंतवणुकीची खात्री देणारे हे प्रदर्शन घर खरेदीदारांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
गृह कर्ज व विशेष सवलतींची सुवर्णसंधी
एकाच ठिकाणी सर्व प्रकल्पांची तुलना करण्याची संधी मिळत असल्याने ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. प्रदर्शनात नामांकित बँका व वित्तीय संस्था जागेवरच सुलभ गृह कर्ज, कमी व्याजदर आणि मंजुरीचे मार्गदर्शन करतील. याशिवाय अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून सणासुदीनिमित्त विशेष फेस्टिव्हल डिस्काऊंट्स आणि स्पॉट बुकिंग ऑफर्स दिल्या जाणार आहेत. सणांच्या मुहूर्तावर स्वतःचे हक्काचे घर किंवा सुरक्षित भविष्यासाठी योग्य गुंतवणूक करू पाहणाऱ्या प्रत्येकाने या तीन दिवसीय एक्स्पोला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
एकाच छताखाली सर्व पर्याय
सर्व बजेटमधील फ्लॅट्स : १, २, ३ आणि ४ बीएचकेचे सर्वसामान्यांना परवडणारे तसेच आधुनिक सुविधांनी युक्त लक्झरी अपार्टमेंट्स.
रो-हाऊस व व्हिला : स्वतंत्र आणि प्रशस्त जीवनशैलीसाठी प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट्स व व्हिलाचे पर्याय.
गुंतवणुकीसाठी प्लॉट्स : उपनगरांतील वेगाने विकसित होणारे ‘एनए’ प्लॉट्स आणि निसर्गरम्य फार्म हाऊसच्या जागा.
व्यावसायिक दालने : प्राईम लोकेशनवरील दुकाने आणि आधुनिक ऑफिस स्पेसेस.
स्टॉल बुकिंग सुरू
आपले प्रकल्प हजारो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बांधकाम व्यावसायिक व उद्योजकांसाठी प्रदर्शनाचे स्टॉल बुकिंग सुरू झाले आहे. स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : आनंद - ९८५०९९११८६, अतुल : ९८२२४०८४३३