

कोल्हापूर : ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (दि. 20) अभिवादन करण्यात येणार आहे. दै. ‘पुढारी’च्या भाऊसिंगजी रोडवरील ‘पुढारी भवन’ या मुख्य कार्यालयात यानिमित्त सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.
दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्केटिंग रॅली काढण्यात येणार आहे. गगनबावडा येथे सकाळी गगनगडावरून प्रेरणा ज्योत आणली जाणार आहे. गगनबावडा ग््राामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप केले जाणार आहे. सायंकाळी डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले जाणार आहे.