

कोल्हापूर : बदलत्या काळात सुरक्षित व समृद्ध आर्थिक भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीची माहिती असणे अत्यंत आवश्यक बनले आहे. नागरिकांना म्युच्युअल फंड व आर्थिक नियोजनाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ आणि ‘आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ तसेच ‘आदित्य बिर्ला कॅपिटल’ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात ‘गुंतवणूक आणि आर्थिक साक्षरता’ सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शनपर उपक्रमामध्ये नागरिकांना समृद्ध आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी गुंतवणुकीचे विविध पर्याय, योग्य नियोजन कसे करावे, जोखीम व्यवस्थापन आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे झोनल स्पीकर अभिजित देशमाने उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना आर्थिक साक्षरतेचे बारकावे आणि सुरक्षित गुंतवणुकीचे सूत्र समजावून सांगतील.
कार्यक्रमाचा तपशील
वार व तारीख : रविवार, ६ सप्टेंबर २०२६
वेळ : दुपारी ४.३० वाजता
स्थळ : हॉटेल अयोध्या, ताराराणी चौक, कावळा नाका, कोल्हापूर
प्रमुख मार्गदर्शक : अभिजित देशमाने (झोनल स्पीकर, आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लि.)
प्रवेश : मोफत
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : ९५४५३२७५४५
या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला असून कोल्हापूर व परिसरातील सर्व नागरिकांनी, नोकरदार, व्यावसायिक, महिला आणि तरुण गुंतवणूकदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर किंवा क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.