Goa liquor smuggling | अबब! ट्रक भरून आणलेली एक कोटीची गोवा बनावटीची दारू जप्त

कोल्हापूर पोलिसांची शाहूवाडीत कारवाई
kolhapur-police-seize-one-crore-illegal-goa-liquor
कोल्हापूर ः जप्त केलेला गोवा बनावटीच्या दारूचा ट्रक. खाली बसलेल्या चालकासोबत पोलिस अधिकारी, कर्मचारी. File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : आजपर्यंत दुचाकी, चारचाकी, टेम्पोमधून गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणताना पोलिसांनी कारवाई केली होती. परंतु 28 सप्टेंबरला चक्क ट्रक भरून बेकायदेशीररीत्या कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू आणताना पोलिसांनी सापळा रचून तब्बल एक कोटीची दारू जप्त केली. पोलिसांनी चालक संतोष बंडू पेटकर (45, रा. शिराळा नाका, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) याला अटक केली.

गोवा बनावटीची दारू रत्नागिरीहून कोल्हापूर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. पेटकर हा ट्रक घेऊन वारूळ (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीत आल्यावर पोलिसांनी त्याला अडवून ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. ट्रकमधील मालाबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने ट्रकमधील मालाची तपासणी केली असता गोवा बनावटीची दारू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. ट्रकमध्ये तब्बल 1,381 दारूचे बॉक्स आढळले. 1 कोटी 4 लाख 56 हजारांची दारू आणि आयशर ट्रक, असा 1 कोटी 16 लाख 61 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news