Kolhapur News : कोल्हापूर शहरासह करवीरमधील २६२ गुंडांची पोलिसांनी घेतली हजेरी

सोशल मीडियावर वर्चस्ववादाच्या रिल्स टाकल्यास माफीनाम्याच्याही रिल्स टाकणार
Kolhapur News
कोल्हापूर शहरासह करवीरमधील २६२ गुंडांची पोलिसांनी घेतली हजेरी
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरासह करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील २६२ सराईत गुंडांची शनिवारी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हजेरी घेतली. करवीर पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी सराईत गुन्हेगारांना दम भरत वर्चस्ववादातून सोशल मीडियावर आवाहन-प्रतिआवाहन देणारे रिल्स टाकल्यास गुन्हेगारांचे माफी मागणारे व्हिडीओ त्यांच्याच अकाऊंटवरून प्रसारित करून माज उतरविण्याचा इशाराही देण्यात आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ४) दुपारी शहरातील ९० गुंडांची हजेरी शाहूपुरी पोलीस ठाण्यात घेतली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, संतोष डोके, श्रीराम कन्हेरकर, किरण लोंढे, विकास जाधव उपस्थित होते. करवीर पोलीस ठाण्यात १७२ गुंडांची हजेरी घेतली. यावेळी करवीर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, कागलचे अजित जाधव, शिरोली एमआयडीसीचे सहायक निरीक्षक सुनील गायकवाड, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे रणजित पाटील, इस्पुर्लीचे अभिजित पाटील उपस्थित होते.

गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, तुमच्याही घरात सण साजरा होतो; मात्र काही सराईत गुंडांना वारंवार सूचना देऊनही त्यांच्या वर्तनामध्ये फरक पडत नाही. यामुळे आता त्यांना समज नाही, तर थेट कारवाई करणार असल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला.

गणेशोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन दक्षता घेत आहे. उत्सवकाळात दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा करवीरचे पोलिस उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news