kolhapur News : गर्भपातासाठी औषधे पुरविणाऱ्याचे नाव निष्पन्न

शोध सुरू : पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा; चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश
illegal abortion
श्रद्धा हॉस्पिटल
Published on
Updated on

कोल्हापूर/बिद्री : शहर, जिल्ह्यात बहुचर्चित ठरलेल्या बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपातासाठी औषधे पुरविणाऱ्या मेडिकल चालकाचे नाव पोलिसांच्या चौकशीत मंगळवारी निष्पन्न झाले. संशयित विक्रेता पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. संशयिताला अटक करून त्याच्या चौकशीतून काही वितरकांचीही नावे चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी मंगळवारी सकाळी तपासाधिकाऱ्याकडून चौकशीचा आढावा घेतला. चौकशीची व्याप्ती वाढवून दोषी ठरणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संशयिताविरुद्ध कठोर कारवाईसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

वैद्यकीय परवाना निलंबित असताना दुसऱ्या डॉक्टराच्या परवान्यावर बेकायदा गर्भलिंग निदान, गर्भपात करणाऱ्या युवराज पाटील याच्यासह त्याच्या साथीदाराच्या तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. डॉक्टरसह संशयित कर्मचारी, एजंटांना अटक केल्यानंतर संबंधितांना गर्भपातासाठी लागणारी औषधे पुरविणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. गर्भपातासाठी लागणारी औषधे पुरविणाऱ्या औषध विक्रेत्याचे नाव निष्पन्न झाले आहे. संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत, असेही सांगण्यात आले. पोलिसांच्या हालचालीची चाहूल लागताच संशयित विक्रेता पसार झाल्याचे सांगण्यात आले.

भक्कम पुरावे गोळा करण्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश

बिद्री येथील गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी आजवर 13 संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. उत्तमकुमार सरदेसाई याच्यासह हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्याकडे सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयात गुन्हा सिद्ध करता यावा, यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news