कोल्हापूर पोलिसांच्या मोहिमेला आव्हान; नागाव-वडगाव परिसरात जुगार अड्डे पुन्हा जोमात

Kolhapur news | "राजकीय पाठिंब्याशिवाय हे धाडस शक्य नाही," अशी भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत
Illegal Matka-Gambling
Illegal Matka-Gambling
Published on
Updated on

सुनील कांबळे

नागाव : कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन सध्या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आक्रमक पावले उचलत असताना, हातकणंगले तालुक्यातील नागाव आणि मौजे वडगाव परिसरात मात्र जुगार माफियांनी पोलिसांच्या मोहिमेला एकप्रकारे आव्हानच दिले आहे. वारंवार होणाऱ्या कारवायांना न जुमानता या भागात जुगार अड्डे पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

कारवाई तरीही 'जैसे थे' परिस्थिती

गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी अनेकदा छापे टाकून मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, कारवाईची तीव्रता कमी होताच हे अड्डे पुन्हा त्याच जोमाने सुरू होतात. यामुळे पोलिसांचा धाक कमी झाला आहे की गुन्हेगारांना प्रशासनातील काही घटकांकडून आगाऊ माहिती मिळते, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

राजकीय व प्रशासकीय साटेलोट्याचा संशय

स्थानिक पातळीवर हे धंदे बिनधास्तपणे सुरू राहण्यामागे राजकीय वरदहस्त आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. "राजकीय पाठिंब्याशिवाय हे धाडस शक्य नाही," अशी भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

तरुणाई आणि संसार धोक्यात

या जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील कष्टकरी वर्ग आणि तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यामुळे अनेक संसार उघड्यावर येत असून गुन्हेगारीच्या घटनांतही वाढ होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अवैध धंदेमुक्त जिल्ह्याच्या संकल्पाला नागाव-वडगावमधील ही परिस्थिती हरताळ फासणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news