Kolhapur Crime : पिस्टल घेऊन दहशत माजविणाऱ्यास अटक

संशयित सराईत गुन्हेगार : 75 हजारांचे गावठी पिस्टल जप्त
Kolhapur Crime News
पिस्टल घेऊन दहशत माजविणाऱ्यास अटक
Published on
Updated on

कोल्हापूर : पाचगाव-गिरगाव (ता. करवीर) परिसरात कमरेला गावठी पिस्टल लावून दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारास मंगळवारी करवीर पोलिसांनी सापळा लावून अटक केली. विशाल बबन जाधव ऊर्फ मांगुरे (वय 29, रा. पाचगाव, मूळ रा. माळ गल्ली, कसबा बावडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 75 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल जप्त केले. पिस्टलसोबत मॅगझिन व राऊंड नसल्याने याबाबतची चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.

संशयित विशाल मांगुरे हा पाचगाव - गिरगाव रस्त्यावर कमरेला गावठी पिस्टल लावून दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिस अंमलदार योगेश लोकरे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक नाथा गळवे, अंमलदार बजरंग लाड, अक्षय पवार, रफिक आवळकर असे पथक गिरगावला रवाना झाले. मंगळवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास संशयित मांगुरे एका फार्म हाऊस परिसरात आला. यावेळी सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ 75 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल मिळाले. पोलिसांनी हे पिस्टल जप्त केले. त्यातील मॅगझिन, राऊंड याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

संशयित मांगुरे याने पिस्टल सोबतचा फोटो दहशत माजविण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच पिस्टलसोबतची एक रिलही त्याने व्हायरल केल्याची चर्चा होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news