Kolhapur Crime : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस अटक

शनिवार पेठेतील घटना; खुनाची कबुली : चार दिवस पोलिस कोठडी
Kolhapur Crime News
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस अटक
Published on
Updated on

कोल्हापूर : कौटुंबिक कलहातून अमानुष मारहाण करून दोन्ही हातांनी गळा घोटून पत्नीचा खून करणाऱ्या गणेश शंकर हुबाळे (वय 40, रा. म्हसोबा गल्ली, सोन्या मारूती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी मध्यरात्री सीपीआर परिसरात बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी बजावली.

कौटुंबिक कलहातून संशयित गणेश याने पत्नी स्वाती गणेश हुबाळे (34) हिला 7 फेबुवारीला मध्यरात्री अमानुष मारहाण करून तिचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यात स्वाती गंभीर जखमी झाली होती. प्रकृती अत्यवस्थ बनल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला होता. स्वातीचा मृत्यू झाल्याने माहेरकडील मंडळींसह नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर आक्रोश करून संशयिताच्या अटकेची मागणी केली होती. पती गणेश हुबाळेविरुद्ध कठोर कारवाई झाल्याखेरीज स्वातीच्या मृतदेहाचा ताबा न घेण्याची भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती. पोलिस ठाण्याच्या आवारात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

सापळा रचून संशयितास घेतले ताब्यात

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पती गणेश हुबाळे पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणसह लक्ष्मीपुरी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली होती. संशयित शासकीय रुग्णालयाच्या पिछाडीस अंधारात दडून बसला होता. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्यासह पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पत्नी स्वाती हुबाळे हिच्या खुनाची कबुली दिली आहे, असे तपासाधिकारी कण्हेरकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news