कोल्हापूर : मौजे परळी परिसरात जंगलक्षेत्राला आग

Kolhapur News : तरूणावर गुन्हा दाखल
Kolhapur News
मौजे परळी परिसरात जंगलक्षेत्राला आग लागल्याप्रकरणी वनविभागाने एकाला ताब्यात घेतले.
Published on
Updated on

सरूड : शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळे परीक्षेत्रांतर्गत मौजे परळी येथील चार एक्टर वनक्षेत्राला शुक्रवारी (दि.२८) आग लागली. या घटनेला जबाबदार धरून एका तरूणाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष सत्तू दाष्टे (वय ३५, रा. परळी पैकी मांडवकरवाडी) असे या तरूणाचे नाव आहे. घटनास्थळी तातडीने पोहचलेल्या वन निरीक्षण पथकाने हा वनवा विझवण्यात यश मिळविले, अशी माहिती परिक्षेत्र वनाधिकाऱ्यांनी दिली.

संतोष दाष्टे हा शेतातील राब पेटवल्यावर सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर ही आग जंगल क्षेत्रामध्ये पसरल्याने ही घटना घडली. दरम्यान, संशयित आरोपी दाष्टे याला वन विभागाच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक कोल्हापूर जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वन संरक्षक के. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेंडाखळे वनक्षेत्रपाल सुषमा नाना जाधव, परिमंडळ वन अधिकारी एम. ए. जासूद, परळी वनरक्षक अतुल कदम, निलेश साठे, वनसेवक बंडू बुक्कम, आरआरटी. टीम यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news