Kolhapur Crime | कोलोली येथे महिलेच्या हातावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून

शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला; परिसरात खळबळ
Woman  Sharp Weapon Attack in Kololi Panhala
छबुताई सर्जेराव पाटीलPudhari
Published on
Updated on

Woman Sharp Weapon Attack in Kololi Panhala

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छबुताई सर्जेराव पाटील असे मृत महिलेचे नाव असून त्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Woman  Sharp Weapon Attack in Kololi Panhala
kolhapur Crime news | महिलेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; तिघेजण ताब्यात

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी (दि.२५) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेमुळे कोलोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news