Accident News | भरधाव कारची खांबाला धडक; दोघे जखमी

पन्हाळा येथे अपघात; बीएसएनएलचा खांब 30 फुटांवर फेकला
पन्हाळा : बुधवार पेठ परिसरात उलटलेली कार.
पन्हाळा : बुधवार पेठ परिसरात उलटलेली कार.
Published on
Updated on

पन्हाळा : कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर रविवारी पहाटे भरधाव कार थेट बीएसएनएलच्या खांबावर जाऊन धडकून उलटली. यात लोखंडी खांब उखडून 30 फूट फेकला गेला. या अपघातात कारमधील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सोनिक विधानी (वय 24, रा. गांधीनगर) हा मित्रासह कारने (एमएच 09- जीझेड 7700) कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे निघाला होता. बुधवार पेठ परिसरात कार आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या बीएसएनएलच्या खांबावर जाऊन जोरात आदळली. अपघाताच्या आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तातडीने घराबाहेर आले. धडकेच्या बीएसएनएलचा खांब उखडून 30 फूट लांब फेकला गेला, तर कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. चालक सोनिक विधानी व त्याचा मित्र जखमी झाले. पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक सीताराम डोईफोडे अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news