कोल्‍हापूर : पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर; पातळी २८.७ फुटांवर

कोल्‍हापूर : पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर; पातळी २८.७ फुटांवर
Kolhapur: Panchganga river water out of basin; level at 28.7 feet
कोल्‍हापूर : पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर; पातळी २८.७ फुटांवर Pudhari Photo

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पंचगंगा नदी यावर्षी प्रथमच पात्राबाहेर पडली.

आज रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा विहार मंडळाच्या बाजूने पंचगंगेचे पाणी पात्रा बाहेर आली असून दुपारी बारा वाजता पाणी पातळी 28.7 फुटांवर गेली होती. जिल्ह्यातील 16 पैकी 14 धरण क्षेत्रातील अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगेच्या पाणी पातळी वाढ सुरूच असून ती आता इशारा पातळीकडे (39 फूट) जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news